चंदन पठाणसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना जिजाऊ रत्न पुरस्कार

बीड (प्रतिनिधी) निर्भिड पत्रकार संघ आयोजीत जिजाऊ रत्न पुरस्कार वितरण समारंभ २०१८ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आ.जयदत्त क्षिरसागर, डिवायएसपी खिरडकर, संपादक विजयराज बंब, खालेक पेंटर, काझी मकदुम, शेख मुजीब, काळकुटे, ऍड.शेख शफीक, रुचीता मलबारी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते पोलिस, पत्रकार, शिक्षक, सामजिक कार्यकर्ते यांना जिजाऊ रत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
निर्भिड पत्रकार संघाच्यावतीने २०१८ सालासाठी जिजाऊरत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य दिपाताई क्षिरसागर, पोनि.सय्यद सुलेमान, नामदेवराव क्षिरसागर, सपोनी.गजानन जाधव, पीएसआय.मनिषा जोगदंड, चंदन पठाण, चिंचोलकरमामा, अविनाश वाघीरकर, पठाण अमजद खान, अभिजीत नखाते, अशोक होळकर, दत्ता देशमुख, सिराज खान आरजु, रवी उबाळे, शेख रिजवान आदिंना २०१८ चा जिजाऊ रत्न पुरस्कार मिळाला आहे. मान्यवरांच्या हस्ते सर्वांचा सन्मानपूर्वक सत्कार करून सन्मानचिन्ह देण्यात आले

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.