'चूप बैठो,हम कोरोना टेस्ट कर रहे है'
म्हणत माजलगावात शिक्षक कॉलनीत दरोडा;
वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत रोख रकमेसह दागिन्याची केली लूट.
माजलगाव प्रतिनिधी दि.2
माजलगाव शहराच्या हद्दीत असणार्या भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत आज गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दरोडा पडला.यावेळी सहा अज्ञात दरोडेखोरांनी 'चुप बैठो हम कोरोना टेस्ट कर रहे है' म्हणत घरातील वृद्ध दाम्पत्यास शस्त्राचा धाक दाखवून काठीने मारहाण केली.यावेळी दरोडेखोरांनी घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेची लूट करून पोबारा केला.