Add new comment

नगराध्यक्ष,सरपंच थेट जनतेतुन निवडणार

नगराध्यक्ष,सरपंच थेट जनतेतुन निवडणार 
बीड (प्रतिनिधी):- आगामी नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतुन निवडण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी दिली. यासोबतच अनेक महत्वाचे निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ठाकरे सरकारच्या काळात केलेल्या वार्ड रचनेतही बदल करण्याचे संकेत यावेळी त्यांनी दिले. वार्ड रचनेबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे हा बदल करण्याचे संकेत त्यांनी दिले. दरम्यान राज्यात सत्तांतर झाल्यापासुन नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतुन निवडला जाण्याची चर्चा सुरू होती. अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब झाले असुन मंत्रीमंडळ बैठकीत घेतला आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.