भिंत अंगावर पडून ६ वर्षीय मुलीचा मृत्यू*


माजलगांव(प्रतिनिधी )दि.२८--शहरातील ईदगाह मोहल्ला येथे नगर परिषदेमार्फत साफसफाई सुरू असताना इकरा निसार सय्यद ही ६ वर्षाची मुलगी जेसीबीच्या साहाय्याने भिंत पाडत असताना मुलीच्या अंगावर भिंत पडून तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली.
-इदगाह मोहल्ला भागात गुरुवारी दुपारी जेएसीबी ने साफसफाई सुरू होती. यावेळी भिंतीच्या बाजूने लहान मुले जात असताना जेएसीबी ने भिंत पडली ,,तेथून जात असलेल्या इकरा या मुलीच्या अंगावर पडल्याने त्याखाली दबून तिचा जागीच मृत्यू झाला,या घटनेनंतर तहसीलदार वर्षा मनाळे,मुख्याधिकारी विशाल भोसले,पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर सदरील मुलीस ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी जेसीबी ऑपरेटर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Add new comment