जमीन नावची करत नाही;पत्नीने केला वडिलांच्या मदतीने पतीचा खून!

 

अडीच महिन्यापूर्वी माजलगाव धरणाच्या भिंतीलगत आढळून आले होते प्रेत.

मयताच्या पीएम रिपोर्टवरून दिराने केला गुन्हा दाखल.

राज गायकवाड माजलगाव.

सुमारे अडीच महिन्यापूर्वी 27 सप्टेंबर रोजी माजलगाव धरणाच्या पाण्यात भिंतीलगत दत्तात्रय घायाळ नामक तरुनाचे प्रेत आढळून आले होते.त्याच्या डोक्याला व कपाळावर गंभीर इजा दिसून आल्या होत्या.दरम्यान मयताचे पिएम करून त्याचा व्हीसेरा व हिस्टोपॅथ नमुने राखीव ठेवण्यात आले होते.त्या नमुन्याच्या आलेल्या रिपोर्ट वरून सदरील युवकाचा खूनच करण्यात आला असल्याचा अंदाज आहे. सदरील  खून मयताच्या पत्नीने तिच्या वडिलांच्या मदतीने जमिनीच्या वादातून केला असल्याची फिर्याद मयताच्या भावाने शहर पोलीस दिली आहे.

 

 दि 27/09/2021 रोजी दुपारी 12.00 वा चे सुमारास माजलगाव धरणाच्या भिंतीलगत एका युवकाचे प्रेत आढळून आले होते. चौकशीअंती सदरील प्रेत दत्तात्रय घायाळ नामक युवकाचे असल्याची ओळख पटली.यावेळी मयताच्या कपाळावर डोक्यावर गंभीर स्वरूपाचे जखमा होत्या.तेव्हा पोलीसांनी माजलगाव ग्रामीन रूगनालयात नेले.सदरबाबत माजलगाव शहर पोलीस पंचनामा करून वैदयकिय अधिकारी माजलगाव ग्रामीन रुग्ण्यालय यांचे कडुन पीएम करण्यात आले.या वेळी तपासणी कामी मयताचा व्हिसेरा व हिस्टोपॅथ नमुने राखीव ठेवून शहर पोलिसात अकस्मत मृत्यु र.न. 22/21 कलम CRPC 174 प्रमाणे दाखल करण्यात केला होता.दरम्यान मयताचा डोक्यावर व कपाळावर गंभीर स्वरुपाच्या जखमा असल्याने मयताच्या भावाने मयताच्या खून करण्यात आला असल्याचे पोलिसांना सांगितले होते.व सदरील खून मयताची पत्नी गीता घायाळ व तिचे वडील जनार्दन मस्केने जमिनी नावची करून देत नाही म्हणून केला.असे फिर्यादीत सांगितले होते.दरम्यान सुमारे अडीच महिन्यानंतर 12 डिसेंबर रोजी मयत तरुण दत्तात्रय घायाळ याचा तपासणीसाठी राखीव ठेवण्यात आलेला नमूना व्हीसेरा व हिस्टोपथचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. त्या रिपोर्टनुसार सदरील यूवकाचा खूनच करण्यात आल्या असल्याचा अंदाज आहे.मयताचा भाऊ पवन राम किसन घायाळ यांच्या फिर्यादीवरून मयताची पत्नी गीता घायाळ व सासरा जनार्दन मस्के (रा. टाकरवन) विरुद्ध शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.