अल्पवयीन मुलीचा विवाह लावणे पडले महागात.

 

आई-वडील,सासू-सासरेसह नवऱ्या मूलावर पोस्को दाखल.

माजलगाव तालुक्यातील घटना.

बेळगाव एमएलसी वरून ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल.

राज गायकवाड माजलगाव.

माजलगाव तालुक्यातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावणे माहेर,सासरकडच्या कुटुंबीयांना महागात पडले. विवाहानंतर गरोदर राहिलेल्या अल्पवयीन मुलीस कर्नाटकातील शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी केल्यानंतर मृत बाळ जन्मल्याने ही बाब उघड झाली.दरम्यान बेळगावहून ग्रामीण पोलीस ठाणे माजलगाव आलेल्या m.l.c. नुसार पीडित मुलीच्या आई-वडिल सासू-सासऱ्यासह नवऱ्या मुलावर पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी  पिडीत  वय 16 वर्षे 11 महिने ही गरोदर असल्याने उपचारकामी दिनांक 05/12/2021 रोजी 12.27 वाजता BELAGAVI INSTITUTE OF MEDICAL SCIENCE , HOSPITAL येथे शरीक करण्यात आले. तिथे तिने लहान बालकाला जन्म दिला व ते बालक एका दिवसात मृत पावले . तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी वयाबाबत पडताळणी केली असता, सदर पिडीतचे वय 16 वर्षे 11 महिने असून अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले.सदरची पिडीत हि अल्पवयीन असताना तिचे वडील नामे उत्तम चव्हाण ( पुर्ण नाव माहित नाही ) , आई नामे विमलाबाई उत्तम चव्हाण तसेच सासरा नामे राजु किसन राठोड , सासु सुंदराबाई राजु राठोड यांनी पिडीताचा पती नामे दिलीप राजु राठोड याचेबरोबर अल्पवयीन असताना लग्न लावून दिले . लग्नानंतर पिडीत तिच्या सासरी तिचे पती दिलीपसह राहत असताना पिडीताचा पती नामे दिलीप राजु राठोड यास पिडीत ही अल्पवयीन आहे हे माहित असतानादेखील तिच्याशी वारंवार शारीरीक संबंध ठेवले.त्यामुळे ती गरोदर राहीली आहे . सदरची पिडीत व तिचा पती दिलीप असे कर्नाटक राज्य येथे ऊस तोडणीचे काम करीत असताना सदर पिडीत ही 31 आठवड्यांची गरोदर राहिली.यावेळी तिच्या पोटात कळा उठू लागल्याने ती उपचार कामी BELAGAVI INSTITUTE OF MEDICAL SCIENCE , HOSPITAL येथे शरीक झाली.तेथे तिने एका बालकाला जन्म दिला. व तो बालक एक दिवसात मृत पावला आहे . म्हणून  ( 1 )वडील -उत्तम चव्हाण ( 2 )आई -विमलाबाई उत्तम चव्हाण  ( 3 ) सासरा-राजु किसन राठोड , ( 4 ) सासु-सुंदराबाई राजु राठोड व ( 5 )पति- दिलीप राजु राठोड  यांच्याविरुद्ध भादंवि 1860 कलम 376 ( 2 ) ( एन ) सह बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षक अधिनियम 2012 चे कलम 4 , 6 सह बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 चे कलम 9 , 10 , 11 अन्वये पो.उपनिरीक्षक नीलेश ईधाते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.