Add new comment

दुचाकीला धडक देऊन टेम्पो सह चालक फरार

दुचाकीला धडक देऊन टेम्पो सह चालक फरार ;
 एकाची प्रकृती चिंताजनक, रोकणालर्यांच्या अंगावर टेम्पो चढवण्याचा प्रयत्न.

नेकनूर : सय्यद अर्शद

नेकनुर-येळंब (घाट) दरम्यान बीड-केज रोडवर असलेल्या साळवण्या पुलात एका दुचाकीला टेम्पो ने जोराची धडक दिली आहे. या अपघातानंतर टेम्पोसह चालक पसार झाला आहे. आज दि. १९ डिसेंबर रोजी दुपारी २:०० च्या दरम्यान शेख जम्मील शेख अजीज वय ६२ वर्ष रा. गांधी नगर, अंबाजोगाई हे त्यांचा मुलगा मुस्तखिम शेख वय १० सोबत नेकनुरकडे कडे बजाज कंपनीच्या (डिस्कव्हर) दुचाकी वरून जात होते. यादरम्यान अतिवेगात असलेल्या आयशर कंपनीच्या टेम्पो क्र. एम. एच. ४४ यु. ७४८६ ने जोराची धडक दिली यामध्ये शेख जम्मील शेख अजीज हे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे तर १० वर्षीय मुस्तखिम शेख याला देखील डोक्याला मार आहे. या घटनेनंतर घटनास्थळावरून टेम्पो चालकाने पळ काढला त्याचा काही तरुणांनी पाठलाग केला असता त्यांच्या देखील अंगावर टेम्पो चढवण्याचा या चालकाने प्रयत्न केला. यामुळे या घटनेनंतर काही वेळ बीड-केज रोडवर या टेम्पो चा थरार पाहायला मिळाला. घटनास्थळावरून जखमींना नेकनुरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता प्रकृती चिंताजनक असल्याने अंबाजोगाई येथे रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.