सिंदफणा नदीच्या पाण्यात पडून किशोरवयीन मुलाचा मृत्यू

सिंदफणा नदीच्या पाण्यात पडून किशोरवयीन मुलाचा मृत्यू

माजलगाव दि.25 (प्रतिनिधी )

सिंदफना नदीच्या पाण्यात पडून किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाला. ही घटना जुना माजलगाव शहरातील सिद्धेश्वर मंदिरालगत सोमवार दिनांक 25 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडली.

वलिद नासेर (अल्सारी)चाऊस वय 15 वर्षे राहणार पाटील गल्ली.हा मुलगा सकाळी साडेदहा वाजता जुन्या शहरातील सिद्धेश्वर मंदिरा जवळून वाहणाऱ्या सिंधफणा नदी पात्रात पडल्याची माहिती परिसरात पसरली होती.त्यानंतर परिसरातील तरुणांनी नदीपात्रात त्याची शोध मोहीम राबवली.बारा वाजण्याच्या दरम्यान त्याचे मृत अवस्थेतील शरीर सापडले.दरम्यान शवविच्छेदनासाठी बॉडी जवळच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आली आहे.मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

घटनास्थळी चप्पल जोडासह स्टिक फास्ट ट्यूब आढळून आल्याने शंका कुशंका!

ज्या ठिकाणच्या नदीपात्रात वलिद चाऊसचा बुडून मृत्यू झाला.त्या ठिकाणी त्याच्या पायातील चप्पल जोड व आजूबाजूला स्टिकफास्टच्या चार-पाच ट्यूब आढळून आल्या.या ट्यूब येते कशा आल्या हा प्रश्न आहे.या ट्यूबचा नशासाठी काही किशोरवयीन मुले आहारी गेले असल्याची परिसरात चर्चा होती.त्यामुळे या ठिकाणी या स्टिक फास्टच्या ट्यूब आढळून आल्याने शंकाकुशका काढल्या जात आहेत.यामुळे पालकात चिंतेचे वातावरण आहे.दरम्यान हा सर्व प्रकार शिवविच्छेदनाच्या येणाऱ्या अहवाला नंतर स्पष्ट होईल. 

परळी शहरातही एक 24 वर्षीय तरुण पाण्यात बुडाल्याची माहिती असून दुपारी उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.