बीड शहर

भाचा व मुलाला वाचवितांना सुनिल पंडित यांचाही मृत्यू

दैठण येथील घटना

दोन महिन्यातली तिसरी घटना

=======================

 

तलवाडा प्रतिनिधी 

 

भाचा व मुलाला वाचवितांना सुनिल पंडित यांचाही मृत्यू

दैठण येथील घटना

दोन महिन्यातली तिसरी घटना

=======================

 

तलवाडा प्रतिनिधी 

 

बीड जिल्ह्यात सोमवारपासून सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सर्व दुकाने उघडण्यास परवानगी - जिल्हाधिकारी

बीड जिल्ह्यात सोमवारपासून सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सर्व दुकाने उघडण्यास परवानगी - जिल्हाधिकारी 

बीड ( प्रतिनिधी ) राज्यात अनलॉकची प्रकिया सुरू झाली असून सोमवार दि.7 जून पासून नवीन आदेश लागू करण्यात येणार आहेत.जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढलेल्या आदेशात सर्व प्रकारच्या दुकानाना सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र शनिवार , रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. काय आहे आदेशात वाचा 

बीड जिल्ह्यातील किराणासह अत्यावश्यक सेवा उद्यापासून सकाळी 7 ते 11 सुरू राहणार

बीड दि.31 (प्रतिनिधी ) राज्यात ब्रेक द चैन अंतर्गत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दि.15 जून पर्यंत वाढवण्यात आला आहे. यासंदर्भात बीड जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज सोमवारी   नवीन आदेश काढले आहेत. सदर आदेशानुसार आता जिल्ह्यात दि.1 जून पासून अत्यावश्यक सेवतील किराणा, भाजीपाला, फळविक्री, चिकन मटण , बेकरी विक्रीची सकाळी रोज सकाळी 7 ते 11 यावेळेत सुरू राहतील व शनिवारी , रविवारी पूर्ण बंद राहतील असे आदेशात म्हटले आहे

बीड जिल्ह्यात 25 मे नंतरही कडक लॉकडाऊन - जिल्हाधिकारी

बीड जिल्ह्यात 25 मे नंतरही कडक लॉकडाऊन - जिल्हाधिकारी 

बीड दि.24 ( प्रतिनिधी ) जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन दि.25 मे रोजी रात्री 12 पर्यंत लावण्यात आलेला होता. मात्र आता त्यात आणखी 6 दिवसांची वाढ करण्यात आली असून दि.31 मे रात्री 12 पर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज दुपारी आदेश काढले आहेत. केवळ भाजीपाला फळे विक्रीसाठी सकाळी 7 ते 9 सवलत देण्यात आली आहे. अन्य आस्थापना सुरू राहणार नाहीत असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील ठोक कृषी विक्रेत्यांना सकाळी 11 ते सांय 7 यावेळेत परवानगी:माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची सूचना मान्य

 

बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील खते बि - बियाणे फर्टीलायजर दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याशी चर्चा करून निवेदनाद्वारे केली होती त्यानुसार ठोक कृषी विक्रेत्यांना दि 21 ते 25 मे दरम्यान सकाळी 11 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे

बीड जिल्ह्यात शनिवारपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन

बीड जिल्ह्यात शनिवारपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन

बीड दि.13 ( प्रतिनिधी ) जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिनांक 15 मे ते 25 मे या कालावधीत कडक  लॉकडाऊन करण्याचे आदेश आज दुपारी काढले आहेत. दहा दिवसाच्या कालावधीत वैद्यकीय सेवा वगळता सर्व प्रकारच्या आस्थापना पूर्ण वेळ बंद राहणार आहेत.सदरील आदेश शनिवारी दि.15 मे रोजी रात्री 12 पासून लागू होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

मांजरसुंभा महामार्ग पोलिसांनी वेळीच दुरुस्ती केल्याने ऑक्सिजन टँकर वेळेवर पोहचले

बीड ( प्रतिनिधी ) बीड येथे हॉस्पिटलकरीता येणारे ऑक्सिजन टँकरमध्ये जामखेडजवळ दोन वेळा बिघाड झाला. मात्र मांजरसुंभा महामार्ग पोलिसांनी तातडीने धाव घेऊन दुरुस्ती केल्याने ते टॅंकर बीडकडे रवाना झाले.

 

बीड जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये दोन दिवस सकाळी 7 ते 10 सवलत

बीड जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये 
दोन दिवस सकाळी 7 ते 10  सवलत 

बीड दि.8( प्रतिनिधी ) जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी पाच दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये शेवटच्या दोन दिवशी म्हणजेच मंगळवार आणि बुधवार ( दि. 11 व 12 मे ) रोजी अत्यावश्यक सेवासाठी  तीन तासांची सवलत देण्यात आली आहे. यामध्ये किराणा, ड्रायफ्रुट, सुकामेवा, बेकरी, चिकन ,मटण , मिठाईची दुकाने मंगळवार ,बुधवार सकाळी 7 ते 10 यावेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सवलत देण्याची मागणी करण्यात येत होती.

बीड जिल्ह्यात बुधवारपासून तीन दिवस कडक लॉकडाऊन ; वैद्यकीय वगळता अन्य अत्यावश्यक सेवाही बंद

बीड जिल्ह्यात बुधवारपासून तीन दिवस कडक लॉकडाऊन ; वैद्यकीय वगळता अन्य अत्यावश्यक सेवाही बंद 

बीड ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील कोविड -१ ९ विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास नवीन आदेश काढले आहेत. 

कोविड 19 विषाणूचा संसर्ग रोखण्याकरीता नविन आदेश केले आहेत.

धनंजय मुंडेंची अचानक बीडला भेट, पुन्हा घेतला सुविधा व उपाययोजनांचा आढावा

*धनंजय मुंडेंची अचानक बीडला भेट, पुन्हा घेतला सुविधा व उपाययोजनांचा आढावा*

*जी सामग्री उपलब्ध व्हायला अडचण आहे ते मला सांगा, मी उपलब्ध करून देतो - ना. मुंडे*

बीड (दि. ०२) ---- बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे आज रात्री 9 च्या सुमारास अचानक बीड जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा औषध निरीक्षक श्री. डोईफोडे यांच्याकडून कोविड विषयक सुविधा व उपाययोजनांचा ना. मुंडे यांनी धावता आढावा घेतला.

बीड विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची होणार उद्यापासून ऑन दि स्पॉट अँटीजेन टेस्ट

बीड विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची होणार उद्यापासून ऑन दि स्पॉट अँटीजेन टेस्ट 

बीड दि.2 ( प्रतिनिधी ) लॉकडाऊन कालावधीत सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक सेवेसाठी सूट दिलेली आहे. मात्र त्यानंतर अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. मात्र आता दि.3 मे पासून विनाकारण फिरणाऱ्यांची जागेवरच अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी 10 पथके नियुक्त करण्यात आल्याचे आदेश बीड तहसीलदार शिरीष वमने यांनी आज काढले आहेत. 

रेमडेसिविर इंजेक्शनसाठी नोंदणीची गरज नाही , आता रुग्णालयाकडून ईमेलद्वारे होणार मागणी

 

बीड दि.30 ( प्रतिनिधी ) रेमडेसिविर इंजेक्शनसाठी आता उद्या दि.1 मे पासून आयटीआयमध्ये नोंदणी करायची गरज नाही. कारण प्रशासनाने संबंधित रुग्णालयांनाच इमेल द्वारे मागणी नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा त्रास दूर होणार आहे. 

ऑक्सिजन बंद झाल्याने बीडमध्ये दोन रूग्णांचा मृत्यू ;सखोल चौकशी करा - पंकजाताई मुंडे

 

बीड 
अचानक ऑक्सिजन बंद झाल्याने दोन रूग्णांचा झालेला मृत्यू अतिशय दुर्दैवी आहे, या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.

लसीचा डोस घेण्यापुर्वी रक्तदान करा - कृष्णा फरताळे

बीड (प्रतिनिधी);- देशभरात 1 मे पासुन 18 वर्षाच्या पुढील वयोगटातील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. एकदा लसीकरण झाल्यानंतर पुढचे 60 दिवस रक्तदान करता येत नाही. म्हणुन ज्यांना शक्य आहे त्यांनी लसीचा डोस घेण्या अगोदर रक्तदान करावे आणि मगच लस घ्यावी. जेणेकरून लसीकरण प्रक्रियेनंतर रक्ताचा तुटवडा निर्माण होणार नाही असे आवाहन स्व.राहुल भैय्या फरताळे युवा प्रतिष्ठाणचे व युवासेनेचे कृष्णा फरताळे यांनी केले आहे.

Pages