मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या उचलबांगडीच्या हालचाली? शुक्रवारी नगरपरिषदेच्या विशेष सभेत घेतला जाणार निर्णय.


माजलगाव नगरपरिषदेचे कार्यरत मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या उचलबांगडीच्या हालचालींना वेग आला असल्याची विश्वसनीय माहिती आहे.सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी शुक्रवार दि.30 रोजी विशेष सभा बोलावली आहे.या सभेच्या पटलावर इतर विषय असले तरी सभा बोलावन्या मागचा मुख्य उद्देश मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या उचलबांगडीचा असल्याचा सूर नगरसेवकांमधून ऐकायला मिळत आहे.
शुक्रवारी बोलावलेल्या विशेष सभेत मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या कामकाजावर चर्चा होणार असून या चर्चेतून मुख्य सूर त्यांच्या उचलबांगडीचाच निघणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील स्वच्छतेचे टेंडर देऊनही स्वच्छता होताना दिसत नाही तर पिण्याच्या पाण्याचेही बेहाल आहे.त्याचप्रमाणे अनाधिकृत बांधकामे, मुख्याधिकारी विशाल भोसले यांना हाताशी धरून केल्या जात असल्याची ओरड आहे.शहरात वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून रस्ते कामे होत आहेत. सर्वच कामे बोगस व थातूरमातूर होत असूनही मुख्याधिकारी यांनी बी अंड सी अधिकारी व संबंधित गुत्तेदार यांना सदरील बोगस कामांविषयी जाब विचारण्याची तसदी घेताना दिसत नाहीत.अशा अनेक कारणांन बाबत त्यांच्यावर ठपका असला तरी आ.प्रकाश सोळंके यांची विशेष मर्जी त्यांच्यावर असल्याने पालिका पदाधिकारी व नगरसेवकांना जुमानत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे शुक्रवारी बोलावलेल्या विशेष सभेत सर्व नगरसेवकांमधून त्यांच्या उचलबांगडीवर शिक्कामोर्तब होणार असल्याचा अंदाज आहे.
Add new comment