राज्याच्या शहरी भागात 8 वी ते 12 वी तर ग्रामीणमध्ये 5 वी ते 7 वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी

राज्याच्या शहरी भागात 8 वी ते 12 वी तर ग्रामीणमध्ये 5 वी ते 7 वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी
बीड दि.10 ( प्रतिनिधी ) कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेल्या शहरी भागातील इयत्ता ८ ते १२ वी चे वर्ग व ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते ७ वी चे वर्ग सुरू करण्याची बाबही शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने राज्य सरकारने आज दि.10 ऑगस्ट रोजी परिपत्रक काढले आहे.त्यात म्हटले आहे की, दिनांक १७ ऑगस्ट , २०२१ पासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते ७ वी चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. मुंबई , मुंबई उपनगर , ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे . तसेच दिनांक २ ऑगस्ट , २०२१ रोजीच्या ब्रेक द चेन मधील सुधारीत मार्गदर्शक सूचनानूसार कोल्हापूर , सांगली , सातारा , सोलापूर , पुणे , अहमदनगर , बीड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , रायगड , पालघर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती विचारात घेवून व अन्य जिल्ह्यांबाबत देखील शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे .त्यामुळे बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Add new comment