Add new comment

सय्यद मुनाफ उर्फ बब्बूभाई बारुदवाले यांचे निधन

सय्यद मुनाफ उर्फ बब्बू बारुदवाले यांचे निधन 

बीड दि.28 ( प्रतिनिधी ) गेवराई येथील सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुनाफ उर्फ बब्बूभाई बारुदवाले यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. आज बुधवारी दुपारी 2.30 वाजता गेवराईतील मोमीनपुरा कब्रस्तानमध्ये त्यांचा दफनविधी होणार आहे.
अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून ते सर्वपरिचित होते. त्यांच्या निधनाची माहिती कळताच अनेकांना धक्का बसला. सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असत मित्रपरिवारही मोठा होता. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई , पत्नी , 
दोन मुले, एक भाऊ,  दोन बहिणी असा परिवार आहे. बब्बू भाई बारुदवाले यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सिटीझन परिवार सहभागी आहे. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.