सिरसदेवी येथे भिंत पडून राधाबाई मिसाळ यांचे निधन


*अतिवृष्टी पावसाने घेतला एका 65 वर्षाची महिलांचा बळी*
========================
तलवाडा प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे जीर्ण भिंत पडल्याने घरात झोपलेल्या राधाबाई मिसाळ वय 65 यांच्या अंगावर भिंत पडून दगडाखाली दबल्याने मृत्यू झाल्याची घटना सिरसदेवी येथे घडली आहे सरपंच रवींद्र बाप्पा गाडे ग्रामसेवक देवकर, मंडळाधिकारी खेडकर, तलाठी व बीट जमादार श्याम तोडे साहेब यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे मिसाळ यांच्या पश्चात कोणी नसल्यामुळे मृतदेह शवविच्छेदनासाठी जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवण्यात आले असून नातेवाईक कडे मृत्यू देह ताब्यात दिले आहे अंत्यविधी करण्यात आले आहे तलवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सिरसदेवी बीट जमादार श्याम तोंडे हे करीत आहे
Add new comment