बीड जिल्ह्यात बारावीचा 99.17 टक्के निकाल

बीड जिल्ह्यात बारावीचा 99.17 टक्के निकाल
बीड दि.3 ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षाचे ऑनलाईन निकाल आज मंगळवारी दुपारी 4 वाजता जाहीर झाला. बीड जिल्ह्याचा निकाल 99.17 टक्के लागला आहे. जिल्ह्यातुन 35028 विद्यार्थी परीक्षासाठी बसले होते.त्यापैकी 34739 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 99.40 टक्के तर मुलांचे प्रमाण 98.46 टक्के आहे. यंदाही जिल्ह्यातील मुलीच हुश्शार ठरल्या आहेत. कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा न घेता जाहीर झालेला हा पहिला निकाल आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सिटीझनच्या वतीने हार्दिक अभिनंदन.
बीड जिल्ह्यातील बीड तालुका 98.08, पाटोदा 99.26, आष्टी 99.64, गेवराई 99.84, माजलगाव 99.91 , अंबाजोगाई 98.61, केज 99.71, परळी 99.62, धारूर 99.14 आणि वडवणी तालुक्याचा 99.68 टक्के निकाल लागला आहे. याप्रमाणे तालुका निहाय निकाल जाहीर झाला आहे.
Add new comment