बीड जिल्ह्यात पीएसआयला 80 हजाराची लाच घेतांना पकडले
बीड ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील अंभोरा ( ता.आष्टी ) येथील पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे यांना 80 हजाराची लाच घेतांना पकडण्यात आले. औरंगाबाद येथील एसीबीने आज ही कारवाई केली.
याबाबत औरंगाबाद एसीबीने दिलेली माहिती अशी की, लोकसेवक पोलीस उपनिरीक्षक राहुल पांडूरंग लोखंडे, ने. पोलीस स्टेशन अंभोरा, ता.आष्टी, जी. बीड ( रा.तिरूपती पार्क, पिसादेवी पार्क-A प्लाँट नंबर 02 औरंगाबाद ) यांना पकडण्यात आले. लाच मागणी 20/07/2021रोजी केली. लाचेची मागणी- 80,000/- रुपये आहे. यातील तक्रारदार यांचेविरूध्द पोस्टे. अंभोरा येथे दाखल असलेल्या गुन्हयात त्यांना मंजूर असलेला अटकपूर्व जामीन मा. हायकोर्टाकडून रद्द न करण्यासाठी व गुन्ह्यात असलेल्या गाड्या जप्त न करण्यासाठी यातील आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 1,00,000/ - रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 80,000/- रूपये लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. त्यांनतर आज औरंगाबाद एसीबीने ही कारवाई केली.
Add new comment