कोरोना शासनादेश झुगारनाऱ्या 50 व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई.

 

महसूल पोलीस पालिका प्रशासनाची संध्याकाळी शहरात कडक मोहीम सुरु.

माजलगाव प्रतिनिधी दि.2

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कोरोना महामारी रोखण्यासंदर्भात नियमावली तयार केली आहे.परंतु या नियमांना झुगारत शहरात मोठ्या प्रमाणात व्यापारी आपला व्यवसाय सुरु ठेवून शासनआदेश पाळत नसल्याने महसूल पोलीस पालिका प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवत शहरात संध्याकाळी 50 दुकानांवर दंडात्मक कारवाई केली. तरी या मोहिमेदरम्यान अनेक दुकाना सील केल्या.या मोहिमेने शहरात व्यापाऱ्यांमध्ये धांदल उडाली आहे.

जिल्ह्यात शासनाचे कोव्हीड  संदर्भात विशेष नियमावली जाहीर करण्यात आली असली आहे.तरी व्यापार्‍यांकडून त्याचप्रमाणे नागरिकांकडून शासन आदेशाचा भंग होताना दिसत आहे.दरम्यान वीकेण्ड सितिल निमावली काळात शनिवार-रविवारीही व्यापारी आपला व्यवसाय करताना दिसत आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने शनिवारी रात्री उशिरा पासून तालुक्यात व शहरात दंडात्मक मोहीम सुरू केली।आहे.यावेळी रात्रीतून प्रशासनाने  जवळपास 10 हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करून तब्बल 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला.तर सोमवार दिनांक 2 रोजी संध्याकाळी महसूल,पोलिस, पालिका प्रशासनाने रस्त्यावर उतरून शहरातील जवळपास 26 दुकानांवर कारवाई केली.दत्तात्रेय ड्रेसेस,राज टेलर्स,महावीर जनरल,पुनम साडी सेंटर,माऊली फोटो,मोहिनी गारमेंट, राजू दाभाडे,अलंकार ज्वेलर्स,कनक ज्वेलर्स,गायके ज्वेलर्स,श्रद्धा सुवर्णकार,पैजने ड्रेसेस इतक्या दुकानांवर दंडात्मक कार्यवाही केली. तरी या मोहिमेदरम्यान अनेक दुकानांना सील केले.तालुका प्रशासनाच्या या कडक मोहिमेने व्यापारी वर्गात मोठी धांदल उडाली असून सदरील मोहिमेने नियमांची पायमल्ली करणाऱ्यावर मोठा अंकुश लागण्याची शक्यता आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.