बीडच्या सिव्हीलमध्ये करोनाबाधित महिलेवर म्युकरमायकोसिसची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

बीडच्या सिव्हीलमध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णावर पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

बीड दि.19 ( प्रतिनिधी ) येथील जिल्हा रुग्णालयात करोना बाधीत महिलेवर म्युकरमायकोसिस विशेष शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. 
६५ वर्षीय महिला रुग्ण दोन महिन्यापुर्वी १५ दिवस उपचार घेत कोरोना मुक्त होऊन घरी परतली परंतु मागिल ६ ते ७ दिवसापासून तिला नाक कोंदणे , दात दुखणे व गालावर सुज आल्या कारणाने तिला जिल्हा रुग्णालयातील म्युकरमायकोसिस कक्षात दाखल करण्यात आले. सर्व तपासण्याअंती तिला म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचे निश्चित झाले . त्यामुळे तिच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला . तिच अॅन्टिजन चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली तिला परत ऐकदा कोविड लागण झाल्याचे निश्चित झाले . तरी आज दिनांक 
19 जून शनिवार रोजी दुपारी या महिलेला शस्त्रक्रियासाठी घेण्यात आले . सुरुवातीला इन्डोस्कोपिक सायनस डिब्राईडमेंन्ट हि शस्त्रक्रिया करण्यात आली , परंतु शस्त्रक्रिया दरम्यान संसर्ग अती जास्त असल्याचे लक्षात आले . त्यामुळे तात्काळ बायलॅटरल मॅक्झिलेटॉमी ही शस्त्रक्रिया करण्यात आली . सदरील शस्त्रक्रिया डॉ.चोले सचिन , डॉ.सुधाकर बीडकर यांनी पार पाडली . सदरील शस्त्रक्रियासाठी जिल्हा रुग्णालय बीड येथील डॉ.अभिषेक जाधव व डॉ.मिनाक्षी सोळंके मॅडम यांनी सहकार्य केले . भुलतज्ञ म्हणून डॉ.सोमनाथ वाघमारे यांनी काम पाहिले . सदरील शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थियेटरमध्ये इन्चार्ज श्रीमती जयश्री उबाळे , वैशाली सपकाळ परिसेविका म्हणून श्रीमती मिता लांबोरे , श्रीमती वर्षा कुलकर्णी व श्री.महेंद्रा भिसे तसेच कक्षसेवक म्हणून श्री.राजेश क्षिरसागर व संदिप बामणे यांनी काम पाहिले . नुतन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी वरील सर्वांचे अभिनंदन केले आहे . मा.पालकमंत्री ना.धनंजय मुंडे , बीडचे आ. संदिप क्षिरसागर ,जिल्हाधिकारी रविंद्र जगताप बीड , मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार बीड , उपसंचालक डॉ.एकनाथ माले , आरोग्य सेवा लातूर यांच्या मागदर्शनाखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी , डॉ.राधाकिसन पवार , बीड , डॉ अशोक हुबेकर , यांच्या समन्वयाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी रुजू झाल्यानंतर तातडीने म्युकरमायकोसिस बाधीत रुग्णावर विशेष कक्ष स्थापन करुन संबधीत रुग्णावर जिल्हा रुग्णालय बीड येथेच शस्त्रक्रिया होतील व बाधीत रुग्णांना जिल्हया बाहेर किंवा खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घेण्याची गरज पडणार नाही यासाठी अथक प्रयत्न केले . त्याकामी डॉ सुखदेव राठोड , अति जिल्हा शल्यचिकित्सक बीड , डॉ.सचिन आंधळकर , डॉ.सुधिर राऊत , डॉ.बाबासाहेब ढाकणे , डॉ.महेश माने , डॉ.राम आवाड यांनी सहकार्य केले . यापुढे प्रत्येक म्युकरमोकोसिस बाधित रुगणांचे उपचारासाठी लागणारे लाखो रुपये वाचतील तसेच यानंतर जिल्हा रुग्णालयावर जनतेचा विश्वास आधिक दृढ होईल व ग्रामिण भागातील जिल्हा रुग्णालयातील कदाचित ही पहिली शस्त्रक्रिया असावी असे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सांगितले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.