बीड जिल्ह्यातील तीन तालुक्यात आता कडक निर्बंध ; वेळ कमी केली

बीड दि.18 ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील आष्टी , पाटोदा,  गेवराई तालुक्यांमध्ये कोवीड -19 विषाणूचा प्रार्दुभाव त्वरित ओटाक्यात आणणे आवश्यक आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेता संभाव्य रुग्ण संख्या व उपलब्ध वैद्यकीय संसाधनांचा विचार करता . रुग्ण संख्या नियंत्रित करणे हे अत्यंत आवश्यक आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आज नवीन आदेश काढले आहेत.सदर आदेशाची अंमलबजावणी सोमवार दि.19 जुलै पासून होणार असून हे नियम दि.28 जुलै पर्यंत राहणार आहेत. तिन्ही तालुक्यात आता वेळ कमी करण्यात आली आहे. 

 

जिल्हाधिकारी यांनी आजच्या आदेशात म्हटले आहे की, 

1. बीड जिल्हयातील आष्टी , गेवराई , पाटोदा या तालुक्यांमध्ये ग्रामीण व शहरी भागात आवश्यक सेवांच्या पुरवठा संबधित आस्थापना उघडण्याचा कालावधी प्रत्येक दिवशी सोमवार ते रविवार सकाळी 07.00 ते दुपारी 12.30 वा . पर्यंत असेल.

बीड जिल्हयातील आष्टी , गेवराई , पाटोदा या तालुक्यांमध्ये ग्रामीण व शहरी भागात सोमवार ते शुक्रवार आवश्यक सेवे व्यतिरिक्त इतर आस्थापना उघडण्याचा कालावधी ( सोमवार ते शुक्रवार ) सकाळी 07.00 ते दुपारी 12.30 वा . पर्यंत असेल . 

शनिवार व रविवार या दिवशी आवश्यक सेवांच्या पुरवठा संबधित आस्थापना वगळता इतर सर्व आस्थापना पुर्ण पणे बंद राहतील .

 

 3 , वरील तालुक्यांमधील सर्व आस्थापनां पैकी जसे की , हॉटेल्ल , रेस्टॉरंट , ई - कॉमर्स सेवा , व्यायामशाळा , सलून , ब्युटी पार्लर इ . आस्थापनाधारकांना या कार्यालयाचे आदेश 05.06.2021 मधील नमुद निबंध वरील कालावधीमध्ये लागु राहतील ,

 4. आष्टी , पाटोदा व गेवराई तालुक्यांमध्ये सकाळी 07.00 वा . ते दुपारी 12.30 . वाजेपर्यंतची आस्थापना सुरु ठेवण्याची सुधारित वेळ लक्षात घेता , दुपारी 01.00 वाजेनंतर केवळ अत्यावश्क कारणांव्यतिरिक्त ( उदा . परगावी प्रवास , वैद्यकीय सेवा इ . ) हालचाल व शहरातर्गत अथवा गावांतर्गत प्रवासास परवानगी असणार नाही .

 5. उक्त बेळे व्यतिरिक्त बिना कारण घराबाहेर पडल्याचे निर्दशनास आल्यास , संबंधिता विरुध्द आपत्ती व्यपस्थापन कायद्यांतर्गत कार्यवाही अनुसरण्यात येईल . 

6. संबंधित कायक्षेत्रातील उपविभागीय अधिकारी , तहसिलदार , उप विभागीय पोलीस अधिकारी , मुख्याधिकारी नगर पालिका / नगर पंचायत , पोलीस निरिक्षक स्थानिक पोलीस स्टेशन . यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सदरील आदेशाची अंमलबजावणी काटेकोर पणे पुर्ण करावी

. 7. शहरांमधील विशिष्ट ठिकाणी अथवा विशिष्ट गाव / वाडी ठिकाणी मोठया प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत असल्याचे निर्दशनास आल्यास अशी शहरी भागांमधील ठिकाणे / गावे / वाडी कंटेन्मेंट झोन ( Containment Zone ) घोषित करण्याबाबतची दक्षता स्थानिक अधिकारी यांनी घ्यावी तसेच ( Containment Zone ) ची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने स्थानिक कर्मचारी यांनी कार्य करावे , क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी याबाबत स्थळ पाहणी करावी .

8. सद्यस्थितीत जिल्हयात कोबीड -19 बाधित असलेल्या रुग्णांकरिता गृह विलगीकरण ( Home lsolation 2 परवानगी पुर्णत : बंद असल्याने ज्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या / कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात कोविड बा रुग्ण गृह विलगीकरणात आढळून येतील त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीप्रमाण कार्यवाही अनुसरण्यात येईल याची नोंद घ्यावी .

9. बाजारपेठांमध्ये विना मास्क फिरणारे नागरिक तसेच विहित कालावधी नंतरही आस्थापना सुरु ठेवणारे व्यवसायिक यांच्यावर दंडात्मक कार्यवाही अनुसरण्यात यावी जेणेकरुन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे पुर्ण होईल .

10. शनिवार रविवार या दिवसांमध्ये आवश्यक सेवे व्यतिरिक्त इतर आस्थापना सुरु राहणार नाहीत याची दक्षता सर्व तहसिलदार यांनी घ्यावी या करिता कार्यक्षेत्रातील उप विभागीय पोलीस अधिकारी , मुख्याधिकारी , नगर पालिका / नगर पंचायत व गट विकास अधिकारी यांच्या सोबत रोज आढावा घ्यावा आणि सर्व तहसिलदार यांनी याबाबत सर्व संबंधित विभागासोबत समन्वय ठेवुन कामकाज करावे . दंडात्मक कार्यवाही प्राधान्याने आणि परिणामकारक असावी .

11. निबंधाचा कालावधी लक्षात घेता . नियंत्रक अधिकारी यांनी शेती विषयक कामे व पीक कर्ज विषयक कामे बाधित होणार नाहीत याबाबत दक्षता घेवुन विवेकाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे .

12. सदर आदेशानुसार करण्यात आलेले बदल हे औद्योगिक क्षेत्रास प्रभावित करणार नाहीत . उद्योगांना यापुर्वीच्या वेळोवेळी निर्गमित्त आदेशांमधील नियम व निबंध पुर्वीप्रमाणे लागू राहतील .

13. जिल्हयातील इतर तालुक्यांमधील क्षेत्रीय अधिकारी यांनी देखील सद्यस्थितीत त्यांच्या तालुक्यांमध्ये रुग्ण संख्या आटोक्यात असली तरी , गाफिल न राहता या कार्यालयाचे वेळोवेळी प्रदान करण्यात आलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे . 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.