बीड जिल्ह्यातील दुकाने आता रात्री 10 पर्यंत सुरू राहणार ; नवीन आदेश आले

बीड जिल्ह्यातील दुकाने आता रात्री 10 पर्यंत सुरू राहणार ; नवीन आदेश आले 

 

बीड दि.14 ( प्रतिनिधी ) ब्रेक द चैन अंतर्गत जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी आज नवीन आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील दुकाने रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. सदर आदेशाची  दि.15 ऑगस्ट पासून अंमलबजावणी होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

 

बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आजच्या आदेशात म्हटले आहे की, 

उपहारगृहे खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने खालील अटीच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे . 

i ) उपहारगृह / वारमध्ये प्रवेश करताना प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहिल क्याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहिल , 

 

ii ) उपहारगृह बारमध्ये काम करणार आचारी , वालपे , व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचान्यांसह सर्व कर्मचान्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहिल व ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पुर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह / चारमध्ये काम करू शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहिल . ml ) वातानुकूलित उपहारगृहाबार असल्यास , वायुवीजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहिल .iv ) प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राहिल . 1 ) उपहारगृह बारमध्ये विहित शारिरीक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था करण्यात यावी . vi ) उपहारगृह ) बारमध्ये निजतुकीकरणाची तसेच सनिटायझरची व्यवस्था असणे आवश्यक राहिल उपरोक्तनुसार उपहारगृहे / यार सुरु ठेवण्यास सर्व दिवस रात्री १०.०० वा . पर्यंत मुभा देण्यात येत आहे . DISTRIC S COM उपहारगृह / वारमधील भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री ९ .०० वाजेपर्यंत घ्यावी . मात्र पार्सल सेवा २४ तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . 

 

2. दुकाने - जिल्हयातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री १०.०० वा . पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन कर्मचान्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहिल.

 

 3.शॉपिंग मॉल जिल्हयातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री १०.०० वा . पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . तथापि , शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणान्या सर्व नागरिकांचेही कोबिड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहिल व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील . 

 

4. जिम्नॅशिअम , योगसेंटर , सलून - स्या वातानुकुलित तसेच विनावातानुकूलित जिम्नॅशिअम , योगसेंटर , सलून स्मा ५० टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री १०.०० वा . पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . तथापि , उक्त संस्था वातानुकूलीत असल्यास , वायुविजनासाठी फॅन व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील . 

 

5. इनडोअर स्पोटर्स - इनडोअर स्पोटर्स असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोबिड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवस झालेले असणे आवश्यक राहील तसेच , या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील . या ठिकाणी खेळाडूना बॅडमिंटन , टेबलटेनिस , स्क्वंश , पैरलल बार , मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे . 

 

6. कार्यालय / ओद्योगिक / सेवा विषयक आस्थापना - सर्व शासकीय / निमशासकीय आस्थापनाचे कर्मचारी , बैंक कर्मचारी , रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पूर्ण करण्यात यावे , ii . ज्या खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचान्यांचे व व्यवस्थापनाचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले असेल त्या आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचाऱ्यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे ज्या आस्थापना वरील कर्मचान्यांना धरून काम करणे शक्य आहे अशा सर्व आस्थापनाच्या व्यवस्थापनानी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी कार्यालयात काम करणे आवश्यक असल्यास कर्मचान्यांच्या गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल अशा प्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करण्यात यावे . तसेच खाजगी कार्यालयाना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . मात्र अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या २५ टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील . 

 

7. जिल्हयातील सर्व मैदाने , उद्याने , चौपाटया , समुद्रकिनार स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील . iii . 63 1 . ii . iii . iv . LECT 8. विवाह सोहळे खुल्या प्रांगणातील / लॉन वरील किया बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण / लॉन मंगल कार्यालय / हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने व कोथिंड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पानन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . खुल्या प्रांगण / लॉन मध्ये होणान्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किया लॉन क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल , बंदिस्त मंगल कार्यालय / हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादित असेल . मात्र कोणत्याही परिस्थीतीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी विडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱ्याला तपासणीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक राहिल्न , या निबंधाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल / कार्यालयावर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल / मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल . मंगल कार्यालय / हॉटेल / लॉन व्यवस्थापन / भोजन व्यवस्थापन / बैंडपथक / भटजी / फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधीत सर्व सलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील . 

 

9. सिनेमागृहे ब मल्टिप्लेक्स - जिल्हयातील सिनेमागृह / नाट्यगृह , मल्टिप्लेक्स ( स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील ) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील . 

 

10. धार्मिक स्थळे जिल्हयातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील . 

 

11. आंतरराज्य प्रवास - ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरिकांना , बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल , अन्य प्रवाशांसाठी ७२ तास पुर्वाची आरटीपीसीआर चाचणी निगेटीक किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहिल . V. तसेच मो SANCE OF 

 

12 कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यात गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र शासनाने तसेच मा सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे . यास्तव गर्दी / जमाव टाळण्यासाठी वाढदिवस , राजकीय , धार्मिक , सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम , निवडणूक प्रचार सभा , रॅली . मार्च , इ . बरील निबंध कायम राहतील , 

 

13. मेडीकल ऑक्सीजनधी उपलब्धता मर्यादीत असल्याने , जर राज्यातील रुग्णसंख्या वाढल्यास व कोवीड रुग्णांच्या उपचारासाठी प्रतिदिन 700 मे . टन किंवा त्यापेक्षा जास्त ऑक्सीजन लागत असल्यास संपूर्ण राज्य शासनाकडुन जिल्हयात तात्काळ पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करून त्यानुसार कठोर निबंध लागू करण्यात येतील . 

 

14. जिल्हयातील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की , मास्कचा वापर हातांची स्वच्छता , शारिरीक अंतराचे पालन , इतरत्र थुकण्यास प्रतिबंध , इ . सर्व निबंधाचे पालन करणे अनिवार्य राहिल .

 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.