क्रुझरजीप मोटरसायकलच्या धडकेत मोठेवाडीचा युवक ठार.
माजलगाव प्रतिनिधी दि.8
भरधाव वेगातील क्रुझर जीपने मोटार सायकलला दिलेल्या जोरदार धडकेत मोठेवाडीचा युवक जागीच ठार झाला. अशी घटना बुधवार दि. 8 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की,मुक्तीराम नागोराव शेळके(वय 30 वर्षे राहणार मोठेवाडी) हा युवक दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान माजलगावा कडून मोठेवाडी आपल्या गावाकडे आपली मोटर सायकल फॅशनप्रो क्रमांक एम.एच. 14 ई.जे.707 वरून जात होता. यावेळी तो राष्ट्रीय महामार्ग 222(61)मोठे वाडी फाट्यावर आला असता पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या क्रुझरजीप क्रमांक mh25 आर.8140 या गाडीने जोराची धडक दिली.या जोरदार धडकेत मुक्तीराम शेळके यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले.दरम्यान मृतशरीराला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जीप चालक फरार असून अपघाती वाहने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.दरम्यान फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शी कडून समजलेली माहिती नुसार क्रुझरजीप वाहन चालक दारूच्या फुल नशेत असल्याने रॉंग साईड ला येऊन त्याने मोटरसायकलला उडवले.
दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्यानी आठवड्यात घेतला तीन लोकांचा बळी.
मागच्या 4 दिवसांपूर्वीच दारूच्या नशेत तर्र असणाऱ्या कार चालकाने अंदापुरी येथील मोटरसायकल वरील डांगे व पिता-पुत्रांना उडउन त्यांचा बळी घेतला होता.त्यातच आज ही मद्यपि जीप चालकाने मोठेवाडी येथील 30 वर्षीय युवकाचा बळी घेतला आहे.मद्यपेई वाहन चालकांमुळे निष्पाप बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आशा दारूबाज वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
Add new comment