उभ्या पिकअपला मोटरसायकल धडकल्याने दोघे जखमी

उभ्या पिकअपला मोटरसायकल धडकल्याने दोघे जखमी

नेकनूर दि.1 ( प्रतिनिधी )  पिकअप रोडवरच पार्क केल्याने दुचाकी गाडी पिकअपवर धडकल्याने दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवार दि.1 ऑगस्ट रोजी दुपारी 4.30 वाजण्याच्या दरम्यान नेकनूर- मांजरसुंबा रोडवर घडली. जखमींना जिल्हा रुग्णालय बीड येथे दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे. श्रावण मासानिमित्त नेकनूर पासून जवळ असलेल्या तांदळवाडी येथील बांगड्याचे व्यापारी राजेभाऊ तांदळे व त्यांची पत्नी वैशाली तांदळे बीड येथून बांगड्या खरेदी करू आपल्या गावी तांदळवाडी येथे दुचाकी क्र.एम. एच 23 बी ई.6813 वर जात होते मांजरसुंबा- नेकनूर रस्त्यावर पिकअप क्र. एम.एच 23 -  7931  हे उभा असल्याने तांदळे यांची दुचाकी पिकअपच्या पाठीमागून धडकल्याने तांदळे दाम्पत्य जखमी झाले आहे . त्यांना उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आल्याचे समजते.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.