माजलगावजवळ 8 लाखाचा गुटखा पकडला.

8 लाखाचा गुटखा पकडला.
सांगवीनजीक माजलगाव ग्रामीण पोलिसांची कार्यवाही.
माजलगाव प्रतिनिधी दि.28
महाराष्ट्र राज्याने निर्बंधित केलेला 8 लाख 39 हजार दोनशे रुपयांच्या मुद्देमाला सहित गुटखा माजलगावात विक्रीसाठी येत असताना पकडला.ही कार्यवाही माजलगाव ग्रामीण पोलिसांनी शनिवार दि.27 रोजी संध्याकाळी सांगवी नजीकच्या पुलाजवळ केली.
याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की,पोलिसांना खबऱ्यामार्फत समजले की आष्टी (जिल्हा जालना)येथून एका महिंद्रा पिकप(क्रमांक एमएच 13,डि.ओ. 1576) मधून राज्य शासनाने निर्बंधित केलेला गुटखा माजलगाव शहरात विक्रीसाठी येत आहे.या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित महिंद्रा पिकपचे माजलगाव आष्टी रस्त्यावर शोध कार्य सुरू केले.यावेळी सांगवी नजीकच्या पुलाजवळ पोलिसांना हवा असलेला पिकप आढळून आला.दरम्यान पिकपची पोलिसांकडून तपासणी घेण्यात आली.त्यावेळी पोलिसांना पिकप मध्ये1) सुगंधीत तंबाखू राजनिवासचे 1600 पुढे ज्याची किंमत 3 लाख 72 हजार
2)जाफरानी जर्दा किंमत 67 हजार दोनशे रुपये 3)लीलांड कंपनीचे महिंद्रा पिकप किंमत 4 लाख रुपये.असा एकूण 8 लाख 39 हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.दरम्यान स.पो.नि.निलेश ईधाते यांच्या फिर्यादीवरून पिकप चालक बाळू बाळासाहेब बहिरवाळ राहणार (घोसापुरी-बीड)विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 372,373,328 भादवि नुसार गुन्हा दाखल केला आहे.ही कार्यवाही सा.पो.नि.योगेश खटकळ यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.निलेश इधाते,पो.कॉ. अनिल असेवार यांनी पार पाडली.
Add new comment