Add new comment

बीड जिल्ह्यात बुधवारपासून तीन दिवस कडक लॉकडाऊन ; वैद्यकीय वगळता अन्य अत्यावश्यक सेवाही बंद

बीड जिल्ह्यात बुधवारपासून तीन दिवस कडक लॉकडाऊन ; वैद्यकीय वगळता अन्य अत्यावश्यक सेवाही बंद 

बीड ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील कोविड -१ ९ विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास नवीन आदेश काढले आहेत. 

कोविड 19 विषाणूचा संसर्ग रोखण्याकरीता नविन आदेश केले आहेत.

१) बुधवार , गुरुवार व शुक्रवार
 ( दिनांक ०५/०५/२०२१ , ०६/०५/२०२१ व ०७/०५/२०२१ ) या दिवशी केवळ खालील आस्थापना पुर्णवेळ सुरु राहतील . सर्व औषधालये ( Medical ) , दवाखाने , निदान क्लिनीक , लसीकरण केंद्रे , वैद्यकिय विमा कार्यालये , फार्मास्युटिकल्स , फार्मास्युटिकल कंपन्या , इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स , वाहतुक आणि पुरवठा साखळी , लसींचे उत्पादन व वितरण , सॅनिटायझर्स , मास्क , वैद्यकिय उपकरणे , कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा , पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने , टपाल सेवा इ . उपरोक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चालू राहणार नाहीत . 

 2 ) दुध विक्री केवळ प्रत्येक दिवशी सकाळी ७.०० ते ११.०० वाजेपर्यंत सुरु राहील .
3 ) गॅस वितरण दिवसभर सुरु राहील . 

4) बँकेचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी १०.०० ते दु .१२.०० वाजेपर्यंत अंतर्गत कामकाजासाठी व शासकीय व्यवहारासाठी सुरु राहील .

5) शनिवार व रविवार रोजी ( दिनांक ०८/०५/२०२१ व ० ९ / ०५ / २०२१ ) जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना ( किराणा दुकाने , भाजीपाला , फळविक्री , चिकन , मटन विक्रीचे दुकाने , बेकरी व कृषीशी संबंधित इ . ) केवळ ०७.०० ते ११.०० या वेळेत चालू राहतील . 

6 )  शनिवार व रविवार रोजी ( दिनांक ०८/०५/२०२१ व ० ९ / ०५ / २०२१ ) केवळ हातगाड्यावर फिरुन फळांची विक्री सायकाळी ०५.०० ते रात्री ०७.०० या वेळेत करता येईल . सदरच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असे आदेशात म्हटले आहे. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.