लाइव न्यूज़
उद्यापासुन किराणा,भाजीपाला विक्री सकाळी 7 ते 11 पर्यंत
उद्यापासुन किराणा,भाजीपाला विक्री सकाळी 7 ते 11 पर्यंत
बीड (प्रतिनिधी);- ब्रेक द चैन अतंर्गत बीड जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणखी कडक केले असुन सोमवार दि.19 एप्रिल 2021 पासुन अत्यावश्यक सेवेच्या श्रेणीमध्ये असलेली किराणा दुकाने, भाजीपाला, फळ विक्री, चिकन, मटन विक्रीची दुकाने, बेकरी इ. सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच त्यानंतर अत्यावश्यक श्रेणीतील ही सर्व दुकाने बंद राहतील असा आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज काढला आहे. त्यानंतर केवळ हातगाड्यावर फिरून फळांची विक्री सायं.5 ते सायं.7 वाजेपर्यंत करता येणार आहे. या व्यतिरीक्त वैद्यकीय अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणालाही व्यवसाय करता येणार नाही.
Add new comment