लाइव न्यूज़
Add new comment
बीड जिल्ह्यातील सर्व शिवालये महाशिवरात्रीच्या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश

बीड दि.6 ( प्रतिनिधी ) जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक 11 मार्च रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व शिवालये दर्शनासाठी पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज दिले आहेत. सदरील कालावधीत प्रथेप्रमाणे पूजा व इतर बाबी संबंधित पुजारी व विश्वस्त यांनी कोरोना विषयक नियमाचे पालन करून करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर येथील दर्शन दिनांक 8 मार्च ते 16 मार्च या कालावधीत पूर्णतः बंद करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी जगताप यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
