शेतकर्‍याला विजेच्या खांबाला बांधून विष पाजले 12 जणांविरुध्द गुन्हा दाखल

बीड, (प्रतिनिधी):- शेतातील पाईप एकत्र करत असतांना दहा ते बारा जणांनी एका 42 वर्षीय शेतकर्‍याला काठी, चप्पल, बुट आणि दकडाने मारहाण करून रस्त्याने फरपटत ओढत नेले. विद्युत खांबाला दोरीने बांधून नंतर त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि नंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने विष पाजल्याची घटना युसुफवडगाव शिवारात घडली. याप्रकरणी 12 जणांविरूध्द  कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
युसुफवडगाव पोलिस ठाण्यात विलास मारूती पानढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून बेदम मारहाण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने विष पाजले. याप्रकरणी बालासाहेब मारूती पानढवळे, वैभव बालासाहेब पानढवळे, विकास बालासाहेब पानढवळे, बाळासाहेब पानढवळे, दत्तोबा निवृत्ती शिंपले, बाबा दत्तु शिंपले, आश्रुबा दत्तोबा शिंपले, महादेव धोडिंबा शिंपले, अनुसया बालासाहेब पानढवळे, गिता वैभव पानढवळे, स्वाती विकास पानढवळे व अन्य एक या 12 जणांविरूध्द कलम 307, 143,147, 148, 149 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक कोळी करत आहेत.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.