लाइव न्यूज़
बीड जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना अँटिजेन टेस्ट करण्याचे आदेश


बीड जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना अँटिजेंन टेस्ट करण्याचे आदेश - जिल्हाधिकारी
बीड दि.8 ( प्रतिनिधी ) कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज नवीन आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना कोरोनाची अँटीजन टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जो दुकानदार कोरोना टेस्ट करणार नाही, त्यांना दुकान उघडण्याची परवानगी दिली जाणार नाही. दिनांक 15 मार्च पर्यंत सर्व व्यापाऱ्यांनी आपली अँटिजेन टेस्ट करून घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत. टेस्ट न करता दुकान उघडणाऱ्या व्यापार्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
Add new comment