मोटार सायकलचा कट मारल्याच्या कारणावरुन युवकावर धारदार शस्त्राने हल्ला.

माजलगाव (प्रतिनिधी) 
मोटार सायकलचा कट मारण्याच्या कारणावरून युवकात झालेल्या बाचाबाचीत एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.ही घटना शहरातील महात्मा फुले शाळेच्या पाठी मागील रोडवर शुक्रवार दि 5 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घडली.

याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, सिद्धांत ज्ञानोबा धायजे व त्याचा मित्र विस्वाआनंद राजेश साळवे हे आपल्या मोटारसायकल वरून अशोक नगर कडे जात होते.यावेळी पाठीमागून आलेल्या मोटरसायकल वरील अक्षय उर्फ देवा कसबे व विकास आठवे (रा.अशोक नगर) यांनी त्यांच्या गाडीचा कट मारला. यावेळी सिद्धांत धायजे यांने आमच्या गाडीला कट का मारला म्हणून अक्षय कसबे याला विचारले.यावेळी अक्षय याने सिद्धांतला डायरेक्ट शिवीगाळ करत हातातील हातातील कुठल्यातरी धारदार शस्त्राने उजव्या हातातील अंगठ्या जवळील बोटावर मारून जखमी केले.तसेच हाताच्या पोटरीवरही वार केला.दरम्यान सोबत असणारा विश्वनाथ साळवे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असताना त्यालाही हातात दगड घेऊन त्याच्या पाठीवर व हातावर अक्षय सोबत असणाऱ्या विकास आठवे याने जखमी केले व आमच्या नादाला लागला तर दन तू मला जीवे मारून टाकू अशी धमकी यावेळी अक्षय व विकास याने सिद्धांत व विश्वानंद यास दिली. दरम्यान सिद्धांत धायजे याच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय उर्फ देवा कसबे व विकास आठवे यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात भादवि कलम 324 323,504,506 (34) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक भास्कर राऊत हे करत आहेत.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.