लाइव न्यूज़
Add new comment
बीडमध्ये पत्रकार संघाच्या कार्यक्रमात डॉ.थोरात यांचे मार्गदर्शन
Beed Citizen | Updated: January 6, 2021 - 3:20pm
बीड, (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने येथील स.मा.गर्गे भवनात दर्पनदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पुजन झाले. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी कोरोनामध्ये माध्यमांची भुमिका याविषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार काझी हयातुल्ला आणि बेदरकर यांना सन्मानित करण्यात आली. यावेळी पोलिस अधिक्षक आर.राजा,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, संपादक गंमत भंडारी,संतोष मानूरकर, महेश वाघमारे, वैभव स्वामी यांच्यासह माजी आ.उषाताई दराडे आदींची उपस्थिती होती.
