लॉकडाऊन संदर्भात आठ दिवसात निर्णय - मुख्यमंत्री
राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना उद्यापासून बंदी - मुख्यमंत्री ठाकरे
लॉकडाऊनसाठी आठ दिवसांचा अल्टिमेट
बीड ( प्रतिनिधी ) राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढतोय. संसर्गाची साखळी तोडायची आहे. कोरोना काळात नियम तोडू नका. मधल्या काळात आपण शिथिलता आणली. पाश्चिमात्य देशात सद्या लॉकडाऊन आहे. मास्क हीच आपली ढाल आहे.विना मास्क फिरू नका, काळजी घ्या असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी लाईव्ह संवाद करताना केले. लॉकडाऊनसाठी आठ दिवसांचे अल्टिमेट मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिले असून परिस्थिती पाहून याबाबत आठ दिवसात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आता पुन्हा काही बंधने घालावी लागतील. अर्थचक्र फिरायला लागले असतांना कोरोना वाढत आहे. काही प्रमाणात बंधने पाळावे लागतील. उद्यापासून सर्व राजकीय, सामाजिक , धार्मिक कार्यक्रम बंद. मोर्चा , मिरवणुका , आंदोलनाला बंदी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. अमरावती , अकोला जिल्ह्यात कडक नियम. लॉकडाऊन बाबत पुढील आठ दिवसात परिस्थिती पाहून निर्णय घेणार. ज्यांना लॉकडाऊन नको असेल त्यांनी नियम पाळावेत असे अवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
Add new comment