Add new comment

वृक्षांना दिली पत्रकारांची नावे दर्पनदिनी मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम

बीड, (प्रतिनिधी):- बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दर्पनदिनी आगळावेगळा उपक्रम राबवून वृक्षसंवर्धनाचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी वृक्ष नामकरण सोहळ्यात विविध प्रकारच्या वृक्षांना दिवंगत पत्रकारांची नावे देण्यात आली.
वडवणी तालुक्यातील देवडी येथे आज सकाळी दर्पनदिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर पुतळा अनावरण व वृक्ष नामकरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थिीतत पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता अजित कुंभार, जेष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर, परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख, कार्याध्यक्ष शरद पाबळे, जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, सोशल मिडियाप्रमुख बापुसाहेब गोेरे आदींची उपस्थिती होती. यावेळी त्याठिकाणी लावण्यात आलेल्या वृक्षांना मराठाकार आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांची नावे देण्यात आली. नामफलकही झाडा जवळ लावण्यात आले

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.