लाइव न्यूज़
सावध : बीड जिल्ह्यातील ' त्या ' कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने
बीड दि.11 ( प्रतिनिधी ) देशातील काही राज्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे. महाराष्ट्रातही कोंबड्या आणि कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लू ने झाल्याचे समोर आले आहे.मुंबई, ठाणे, परभणी ,दापोली आणि बीड जिल्ह्यातील कोंबड्या व कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लू पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मत्स्यपालन, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्रालय , नवी दिल्ली यांनी दिला आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे 26 कावळे मृतावस्थेत आढळून आले होते. त्यापैकी तीन कावळ्यांचे मृत अवशेष तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज आला असून तिन्ही कावळे बर्ड फ्लू पॉझिटिव्ह असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे.
Add new comment