Add new comment

राज्यातील शाळा दि.27 जानेवारी पासून सुरू होणार - शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

 

मुंबई - राज्यातील 5 वी ते 8 वीचे वर्ग दि.27 जानेवारी पासून सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. कोरोना विषयक नियमावलीचे पालन करून प्रत्यक्ष पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
सध्या राज्यात केवळ 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. मात्र आता दि. 27 जानेवारी 2021 पासून इयत्ता 5 वी ते 8 पर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याने तब्बल दहा महिन्यांनंतर शाळा गजबजणार आहेत.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.