Add new comment

गेवराईतील ' या ' भागात पूर्णवेळ संचारबंदी

गेवराईतील या भागात पुर्णवेळ संचारबंदी

गेवराई दि.5 (सिटीझन)

गेवराई येथील इस्लामपुरा भागातील एक रूग्ण अहमदनगर येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आला आहे. त्याच्यावर बीड जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या अनुशंगाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गेवराई शहरातील काही भागात पुर्णवेळ संचारबंदी लागु केल्याचे आदेश आज दुपारी काढले आहेत.

गेवराई शहरातील कोल्हेर रोडच्या पश्‍चिमेकडील संजय नगरचा पुर्ण परिसर व इस्लामपुरा, सावता नगर , जुना धोंडराई रोडच्या उत्तरेकडील पुर्ण परिसरामध्ये कंटेनमेंट झोन जाहीर करून प्रतिबंधात्मक व्यवस्था लागु करण्यात आली आहे. हा परिसर कंटेनमेंट झोन घोषित करून पुढील अनिश्‍चित कालावधीसाठी पुर्णवेळ बंद करण्यात येवुन संचारबंदी लागु करण्यात आली आहे.

 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.