बीड जिल्ह्यातील ' त्या ' वाळू माफियाविरुद्ध एमपीडीए ; हर्सूलमध्ये रवानगी
बीड दि.25 ( सिटीझन ) गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या माफियाला जिल्हा प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. तब्बल सहा गुन्हे दाखल असलेल्या विकास गोर्डे याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करून स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने त्यास स्थानबद्ध करून औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात रवानगी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली आहे.
बीड पोलीस अधीक्षक यांच्या सुचनेवरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे चकलांबा यांनी दिनांक 16 मे 2020 रोजी इसम नामे विकास मच्छिद्र गोर्डे ( वय-35) रा.गुंतेगांव (ता.गेवराई ) याचेविरुध्द एम.पी.डी.ए. कायदयाअंतर्गत स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक, बीड यांचे मार्फतीने जिल्हादंडाधिकारी यांना सादर केला होता. विकास गोर्डे विरुद्ध चकलांबा व गेवराई येथे वाळु चोरी,दुखापत,जिवे मारण्याच्या
धमकी देणे,शिवीगाळ करणे,खुनाचा प्रयत्न करणे,सरकारी कर्मचारी यांच्यावर हल्ला करणे,रस्ता अडविणे,सरकारी कर्मचाऱ्यांना धमक्या देणे,गौण खनिजाची चोरी करणे,दंगा करणे,सरकारी कामात अडथळा करणे या व अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. वाळु चोरीचे एकुण 3 गुन्हे व इतर 3 असे एकुण 06 गुन्हे दाखल आहेत.एका गंभीर स्वरुपाचा गुन्हयात न्यायालयाने सदर इसमास 4 वर्षांची शिक्षा ठोठवली आहे. याबाबत नोंद पोलीस अभिलेखावर आहे. सदरील इसम हा वाळु चोरीचे गुन्हे करत असल्याने पोलीसांची त्याचेवर करडी नजर होती. सदर इसम नामे विकास मच्छिद्र गोर्डे (वय-35 ) वर्षे रा.गुंतेगांव याच्यावर मपोका कलम 55 प्रमाणे दिनांक 30 सप्टेंबर 2017 मध्ये पोलीस अधीक्षक बीड यांनी हद्दपारीची कारवाई केली होती, परंतु सदर इसम त्या करावाईस न जुमानता गुन्हे करण्याचे चालुच ठेवून होता. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिनांक 23 मे रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हर्सूल कारागृह औरंगाबाद येथे हजर करून स्थानबद्ध करणे बाबत त्यांच्या कडील आदेश अन्वये आदेशित केले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक सपोनि.चकलांबा व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.भारत राऊत यांना दिल्याने त्यांचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना योग्य त्या सुचना देवून नमुद इसमास ताब्यात घेणे बाबत आदेशित केल्याने
स्थागुशाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पोस्टेचे स्टापसह दिनांक 26 मे 2020 रोजी मौजे गुंतेगांव ता.गेवराई येथे जाऊन गोपनिय खबऱ्या मार्फत माहिती घेवून सदर आदेशित झालेला स्थानबध्द इसम नामे विकास
मंच्छिद्र गोर्डे रा. गुंतेगांव यास ताब्यात घेवून पोलीस ठाणे चकलांबा येथे पूढील कारवाई साठी हजर केले. यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना त्यांनतर पो.स्टे. प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे चकलांबा श्री. देशमुख यांनी योग्य पोलीस बंदोबस्तात दि.26 मे रोजी हर्सुल कारागृह औरंगाबाद येथे दाखल करुण सदर इसमास स्थानबध्द कले आहे. भविष्यातही गुंडगिरी करणाऱ्य व कायद्याला न जुमानणाऱ्या व्यक्तीविरुध्द एम.पी.डी.ए. कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिले आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, हर्ष पोद्दार , अपर पोलोस अधीक्षक विजय कबाडे, गेवराईचे डीवायएसपी स्वप्नील राठोड यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. भारत राऊत, एपीआय. विजय देशमुख , पोउपनि गोविंद एकिलवाले व पोलीस हवालदार अभिमन्यु औताडे, तुळशीराम जगताप, भास्कर केंद्रे, पोलीस नाईक विकास वाघमारे, नरेंद्र बांगर,चालक संतोष हारके यांनी केलेली आहे.
Add new comment