बीडमधील दोन मोठ्या हॉस्पिटलसह डायग्नोस्टिक सेंटरचा परिसर सील !
बीड दि.27 ( सिटीझन ) पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या पेशंटने बीड शहरातील काही भागाच्या अडचणी वाढवल्या आहेत. सदरील पेशंट बीड शहरातील भाजी मंडई ते पत्रकार भवन रस्त्यावरील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यापूर्वी तोच पेशंट अन्य एका हॉस्पिटलमध्ये छातीत दुखू लागल्याने टू डी इको करण्यासाठी गेला होता मात्र तिथून तो तात्काळ गेल्याचे समजते. तर जालना रोडवरील दिशा डायगोनास्टीक सेंटर येथे एक्सरे काढण्यासाठी येवून गेल्याची माहिती समोर आली असून त्यांनंतर तो विवेकानंद हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला होता असेही ट्रेसिंगमध्ये समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रशासनाने या दोन हॉस्पिटलसह डायगोनास्टीक सेंटर असलेला परिसर सील करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. रात्री उशिरा भाजी मंडई ते पत्रकार भवन , राज हॉटेल कॉर्नर सील करण्यात आला असून इतरही भागात पोलीस गेल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान आता त्या हॉस्पिटलमधील डॉक्टर , कर्मचारी यांना आहे तिथेच क्वारंनटाईन करण्यात आल्याचे समजते.
◆◆◆थोडक्यात काय झाले ? ◆◆◆◆
■ दि.18 मे रोजी कारेगावचा तो पेशंट मुंबईहुन ट्रॅव्हल्समधून गावी आला.
■ त्याच्या सोबत गाडीत अन्य 14 जण होते. त्या लोकांना एकत्रित करण्याचे काम सुरू
■ छातीत दुखू लागल्याने तो पेशंट बीडच्या एका हॉस्पिटलमध्ये आला. तेथून एका डायग्नोस्टीक सेंटरमध्ये एक्स रे काढण्यासाठी गेला.
■ भाजी मंडई - पत्रकार भवन समोरील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला.
■ आता तो ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये गेला. तिथे डॉक्टर, कर्मचारी, लॅबवाले ,अन्य रुग्ण, सफाई कर्मचारी, मेडिकल धारक असे अनेक जण त्याच्या संपर्कात आले असावेत. आता त्या सर्वांना ट्रेस करून त्यांचे स्वब तपासणीसाठी घ्यावे लागणार आहेत असे सूत्रांनी सांगितले.
Add new comment