बीड जिल्ह्यात आज 50 रिपोर्ट निगेटिव्ह तर 7 प्रलंबित ; एकही पॉझिटिव्ह नाही
बीड दि.25 ( सिटीझन ) जिल्ह्यातून आज 57 जणांचे स्वॅब तपासणीसाठी लातूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. सोमवारी रात्री उशिरा त्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून 57 पैकी एकही पॉझिटिव्ह आला नसून 50 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 7 प्रलंबित असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान क्वारंटाईन असतांना मयत झालेल्या त्या व्यक्तीचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
बीड जिल्ह्यासाठी आज मोठा दिलासा मिळाला असून आज तब्बल 50निगेटिव्ह तर 7 प्रलंबित असल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे रुग्णसंख्या 39 च आहे. गेल्या आठ दिवसांपासून दररोज काही ना काही रुग्ण वाढत असल्याने जिल्ह्याची काळजी वाढली असतांनाच आज मोठा दिलासा मिळाला आहे.आता दि.26 मे पासून सकाळी 7.30 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत सर्व आस्थापना आणि दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सोशल डिस्टसिंग पाळले जाईल का ? बाहेर होणारी गर्दी टळेल का असे प्रश्न उपस्थित होत असून कोरोनापासून वाचण्यासाठी आता प्रत्येक नागरिकाला आवर्जून काळजी घ्यावी लागणार आहे.
■■ कोविड 19अपडेट /25 मे 2020 ■■
एकूण स्वॅब > 57
पॉझिटिव्ह > 00
निगेटिव्ह > 50
प्रलंबित > 7
प्रलंबित अहवाल उद्या येणार.
सदरील माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
Add new comment