बीडमधील ' ते ' 2 पॉझिटिव्ह कुठले वाचा ; आज पुन्हा 30 व्यक्तींचे स्वॅब पाठविले
बीड दि.26 ( सिटीझन ) जिल्ह्यातून काल 57 जणांचे स्वॅब तपासणीसाठी लातूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यातील प्रलंबित असलेल्या 7 पैकी आज मंगळवारी 2 पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेले 2 रुग्ण बीड शहरातील दिलीप नगर भागातील असल्याचे सूत्रांनी सांगितले. ते दोघेही मुंबईहुन आलेले आहेत अशी माहितीही सूत्रांनी दिली. दरम्यान आज मंगळवारी पुन्हा 30 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सदर अहवाल अप्राप्त आहेत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
बीड जिल्ह्यात आज कोरोनाने चाळीशी ओलांडली आहे. काल तब्बल 50निगेटिव्ह आले होते तर 7 प्रलंबित असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. आज दुपारी 7 पैकी 2 पॉझिटिव्ह आढळले असून 5 प्रलंबित आहेत.
आजच्या 2 रुग्णामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या 41 झाली आहे. आजचे 2 रुग्ण बीड शहरातील जुना धानोरा रोड दिलीप नगर भागातील असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या आठ दिवसांपासून दररोज काही ना काही रुग्ण वाढत असल्याने जिल्ह्याची काळजी वाढली आहे.
■■ अपडेट /26 मे ( दुपार पर्यंत) ■■
एकूण स्वॅब > 57 ( काल पाठविलेले )
पॉझिटिव्ह > 02
निगेटिव्ह > 50
प्रलंबित > 5
आज मंगळवारी जिल्ह्यातून 30 व्यक्तींचे स्वब पाठवले अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
Add new comment