Add new comment

बीड शहरातील हिना नगरमध्ये पूर्ण वेळ संचारबंदी लागू

बीड दि.12 (सिटीझन)  बीड शहरातील हिना नगर येथे एक व्यक्ती 

कोविड - 19 पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे  गुलाब मुब्बशीर अहमद यांच्या घरापासून पासून ते हिना पेट्रोल पंपा पर्यंतच्या परिसरामध्ये Cantainment Zone घोषित करुन प्रतिबंधात्मक व्यवस्था अंतर्गत Conatinient Zone जाहीर करावा, असा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी,बीड यांनी संदर्भ क्रमांक 11 अन्वये सादर केला आहे.
बीड जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की,  जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पुढील प्रमाणे फौजदारी चे कलम 144 नुसार बीड शहरातील श्री. गुलाम मुब्बशीर अहमद यांच्या घरापासून पासून ते हिना पेट्रोल पंपा पर्यंतचा परसिर Containment Zore म्हणून घोषित करण्यात येत आहे. हा भाग पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात येत असल्याचे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी आज शुक्रवारी काढले आहेत. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.