बीड :1 पॉझिटिव्ह रिपोर्ट तर अन्य एक प्रलंबित
बीड दि.29 ( सिटीझन ) बीड जिल्ह्यातून आज शुक्रवारी 118 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 116 रिपोर्ट निगेटिव्ह आले होते तर 2 प्रलंबित होते. त्या 2 पैकी 1 पॉझिटिव्ह आला असून अन्य एक प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. आजच्या 1 रुग्णांमुळे जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 49 + 1 अशी 50 झाली आहे.
बीड जिल्ह्यातून कॉविड -19 च्या निश्चित निदानासाठी 118 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब शुक्रवारी सकाळी लातूर येथे पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल प्रशासनास प्राप्त झाले आहेत. आज पाठविण्यात आलेले सॅम्पल पैकी 116 निगेटिव्ह तर 2 प्रलंबित होते. रात्री उशिरा 2 पैकी 1 पॉझिटिव्ह तर 1प्रलंबित आहे. आज जिल्ह्यातून सर्वाधिक स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यामुळे आजच्या रिपोर्टकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे त्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील दोन मोठ्या हॉस्पिटलमधून 63 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते मात्र ते सर्व निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान काल पर्यंत उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 51 झाली होती मात्र आज दोघे कोरोना मुक्त झाले असून दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आज 49 + 1 = 50 एव्हढी रुग्णसंख्या झाली आहे.
■ आज 1 पॉझिटिव्ह अपडेट दि.29 मे ■
एकूण स्वब - 118
पॉझिटिव्ह - 01
निगेटिव्ह - 116
प्रलंबित -----01 ( केज )
■ कुठले आहेत --- पॉझिटिव्ह ■
1 - बीड शहर ( महिला- वय 40 बालेपीर , मुंबईहुन आलेली आहे . )
सदर माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
Add new comment