Add new comment

बीड सध्या तरी टेन्शन फ्री ! आजच्या 136 पैकी सर्व निगेटिव्ह

 

बीड दि.14 ( सिटीझन ) जिल्ह्यातून आज रविवारी पाठवण्यात आलेल्या 136 व्यक्तींच्या स्वॅबपैकी 93 स्वॅबचे रिपोर्ट संध्याकाळी  निगेटिव्ह आले होते. अन्य 43 रिपोर्टची प्रतिक्षा होती तीही आता संपली आहे. रात्री उशिरा त्या 43 पैकी 43 निगेटिव्ह आल्याने मोठ्ठा दिलासा मिळाला आहे.  आज तब्बल 136 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सध्या सर्व रिपोर्ट आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून 136 पैकी 136 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 
दरम्यान आज जिल्ह्यातून सर्वाधिक रिपोर्ट पाठविण्यात आले होते. त्यामध्ये बीड जिल्हा रुग्णालय आणि येथील कोविड कक्षमधून तब्बल 72 व्यक्तींचे स्वॅब पाठविण्यात आले होते. या 72 व्यक्तींमध्ये ' त्या ' बँके व अन्य विभागाच्या ऑफीसमधील अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश होता. त्यामुळे आजच्या रिपोर्टकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.अखेर सर्वांनाच दिलासा मिळाला असून सध्या तरी बीड टेन्शन फ्री झाले आहेत. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.