बीड - आय मिस यु मॉम , डॅड लिहून त्याने आयुष्य संपवलं !
बीड दि.18 ( सिटीझन ) आय मिस यु मॉम , डॅड .... नाना पोरीला सांभाळा असे लिहून एका विवाहित तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना कामखेडा ( ता.बीड ) येथे आज सकाळी उघडकीस आली.
बीड तालुक्यातील कामखेडा येथील अनिल अशोक जमदाडे या विवाहित तरुणाने दारात गळफास घेवून आत्महत्या केली. घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये ' मी , अनिल ... ' अशी सुरुवात करत मजकूर लिहिला आहे. मी भेटलो गरीब , असहाय म्हणून मी तुटलो , संपलो असा उल्लेख त्यामध्ये असून शेवटी इंग्रजीमध्ये ' I MISS YOU MOM, DAD ' असे लिहिले असून स्वतःच्या दोन मुलींची नावे लिहून त्यांनाही मिस यु ... असे म्हटले आहे. चिठ्ठीच्या एका बाजूला नाना - दादा पोरीला सांभाळ असेही लिहिलेले आहे.
दरम्यान ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा करून चिठ्ठी ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. पत्नीसोबतचे भांडण व इतर कारणाचाही उल्लेख चिठ्ठीमध्ये असल्याने पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
Add new comment