बीड जिल्ह्यात बचत गटांनी तयार केले दीड लाख मास्क ;19 लाखांची उलाढाल

बीड दि.30 ( सिटीझन ) ग्राम विकास विभागांतर्गत उमेद या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब, वंचित, विधवा,अपंग, एकल,अति गरीब अशा कुटुंबातील महिला एकत्र येऊन स्वयंसहायता गट स्थापनकेला जातो.आजमितीस उमेद" अभियानाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात जवळपास दोन लक्ष कुटुंब अभियानाशी जोडली गेली आहेत. जिल्ह्यामधील महिला स्वयंसहायता गटानी सक्रिय सहभाग नोंदवून आतापर्यंत  1 लाख 48 हजार 990 मास्कची निर्मिती केली असून सदर मास्क अत्यंत वाजवी दरामध्ये विक्री करून त्याद्वारे 19 लाख 19 हजार 207 रुपयांची विक्रमी उलाढाल केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना माफक दरामध्ये मास्क उपलब्ध झाले असून लॉकडाऊन सारख्या परिस्थितीमध्ये देखील स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेला आहे.
अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.

विविध सामाजिक संस्था, ग्रामपंचायती आणि शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा स्वयंसहायता गटाने उत्पादित केलेले मास्क वापरण्यास सुरुवात झाल्याने अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक हातभार लागण्यास मदत झाली आहे. त्याच बरोबर मास्क विक्रीतून कोरोना विरुध्च्या लढाईत मोलाची भूमिका बजावत असल्याच्या सामाजिक वनातून ग्रामीण महिलांचा आत्मविश्वास देखील वाढीस लागलेला आहे.
भविष्यात कोविड -१९ या विषाणू विरुद्धच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात मास्कची आवश्यकता असून यामध्ये बीड जिल्ह्यातील स्वयं सहाय्यता गटामार्फत जिल्हयातील तसेच राज्यातील नागरिकांना वाजवी किमतीत मास्क उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण जिल्हाभर नियोजन करण्यात आले असून तशा सुचना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देण्यात
आल्या आहेत.
कोविड-१९ या विषाणू प्रतिबंधासाठी स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेले मास्क वापरून कोविड विरुद्धच्या लढाईत महिला स्वयंसहाय्यता गटांच्या सक्षमीकरणासाठी आपणही आपली मोलाची भूमिका बजावू शकता असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.