सुसंस्कृतपणाचा टेंबा मिरविणाऱ्या भाजपकडून अंगणालाच रणांगण म्हणणे अत्यंत चुकीचे -- कल्याण आखाडे
बीड दि.22 ( सिटीझन ) भारतीय संस्कृतीमध्ये अंगणाचे महत्त्व व पावित्र्य मोठे आहे. मात्र, सुसंस्कृतपणाचा टेंभा मिरविणाऱ्या भारतीय जनता पार्टीकडून अंगणालाच रणांगण म्हणणे अत्यंत चुकीचे व विरोधाभासी असल्याची प्रतिक्रिया सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी व्यक्त केली आहे.
पुढे ते म्हणाले की, अंगण म्हटले की, सडा- सारवण, रांगोळी, तुळशीवृंदावन अशा प्रकारचे मनाला प्रसन्नता देणारं चित्र डोळ्यासमोर येते तर रणांगण म्हणलं की घनघोर लढाई, रक्तमांसाचा सडा असलं मनाला खिन्नता देणारं विचित्र चित्र डोळ्यासमोर ऊभं राहते.
कोरोनाच्या जागतिक आपत्तीच्या काळात आंदोलन करण्यास सुचने एक प्रकारची दुर्बुद्धीच म्हणावी लागेल. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी, आपल्या न्याय हक्कासाठी तसेच आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन छेडण्याचा संवेधानिक अधिकार सर्वांनाच मिळालेला आहे. तथापि, भारतीय जनता पार्टीने राज्याच्या संकटकाळी पुकारलेले बचाव आंदोलन म्हणजे निव्वळ नौटंकी ठरले असून वेळ- काळ याचे भान ठेवायला आणि जना- मनाची काही बाळगायला पाहिजे होती अशा तीव्र भावना जन माणसामध्ये उमटल्या आहेत. जेवढा गाजावाजा केला गेला त्या तुलनेत मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहून राज्यातील जनतेने आंदोलनाचा सपसेल फज्जा उडून भाजपच्या या मानसिकतेला झिडकरल्याचे स्पष्टपणे दिसून आले. यामुळे भाजपचे पुरते हसं झाले असून सत्ता विरहातून हे सगळं घडत आहे हे न समजण्या इतपत जनता दुधखुळी नाही असेही त्यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.
Add new comment