Add new comment

नेकनूरजवळ युवक जागीच ठार

 

नेकनूर दि.23 ( सिटीझन ) येथून जवळच असलेल्या चंद्राई हॉटेल समोर अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे.
मयताची ओळख पटली नाही. मयत नेकनुर ते येळंब रोडवर पायी जात असताना अज्ञात वाहनाने त्यास चिरडून गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केले जात आहे. अपघात इतका भीषण होता की इसमाचा पूर्ण मेंदूच बाहेर पडाला होता. मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी नेकनूर प्राथमिक रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. जर मयताची ओळख पटली नाही तर मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येईल अशी माहिती नेकनुर पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल युनुस बागवान यांनी दिली आहे. कुणाला मयताची ओळख असेल तर त्यांनी नेकनूर पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.