लाइव न्यूज़
बीड जिल्ह्याला मोठा दिलासा ; 42 पैकी 35 रिपोर्ट निगेटिव्ह तर 7 प्रलंबित
बीड दि.22 ( सिटीझन ) बीड जिल्ह्यातून 42 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी शुक्रवारी रात्री उशीरा 35 रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात 29 रुग्णच कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डामध्ये काल रात्री मयत झालेल्या तरुणाचा रिपोर्टही प्रलंबित असल्याचे आल्याचे सूत्रांनी सांगितले. आता कालचे 3 आणि आजचे प्रलंबित 7 असे 10 रिपोर्ट उद्या येण्याची शक्यता आहे.
Add new comment