बापरे, बीडजवळ सापडल्या तलवारी, धारदार सुरे आणि रामपूरी चाकू
बीड दि.22 ( सिटीझन ) बीड शहरापासून जवळच असलेल्या पालवण चौक परिसरातील मस्के वस्ती या भागात छापा टाकून पोलिसांनी तलवारी धारधार सुरे, रामपुरी चाकू आणि छऱ्याची गण असा अवैध शस्त्र साठा जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बीड शहर व जिल्हयात अवैध शस्त्र बाळगणारे इसमांची माहिती घेवून केसेस करणे बाबत आदेश केलेले आहे. त्यावरुन एलसीबी पोलीस निरीक्षक भारत राऊत तसेच त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पालवन चौक, मस्के वस्ती, बीड येथे राहणारा इसम नामे करण भिमसिंग टाक याने तो राहत असलेल्या राजू महासिंग टाक याचे राहते घरी अवैध शस्त्रसाठा केला आहे.त्यावरुन सदर ठिकाणी जावून छापा मारला असता राजू टाक याचे घरझडतीमध्ये
इसम नामे करण भिमसिंग टाक रा.बलभीमनगर, पेठ बीड ह.मु.पालवन चौक, मस्के वस्ती याने त्याचा नामे राजू महासिंग टाक रा.पालवन चौक, मस्के वस्ती याचे राहते घरात 4 धारदार तलवारी, 2 धारदार सुरे तसेच 1रामपुरी चाकू व 1 छ-याची गण असा 14 हजार 200 रुपयांचा अवैध शस्त्रसाठा केलेला मिळून आला.पोलिसांनी तो जप्त करुन सदर आरोपीविरुद्द पो.स्टे.बीड ग्रामीण येथे
गु.र.नं.176/2020 कलम 4 / 25 भारतीय हत्यार कायदा सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपीस ताब्यात घेतले आहे.सदरचा अवैध शस्त्रसाठा कशासाठी केला होता व शस्त्रे कोठून आणली याबाबत तपास चालू आहे. राजू टाक याचेवर यापुर्वी 16 विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, डीवायएसपी भास्कर सावंत, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.भारत राऊत, पोउपनि गोविंद एकीलवाले, पोलीस कर्मचारी तुळशीराम जगताप, भास्कर केंद्रे, मुंजाबा कुव्हारे, विकास वाघमारे, नरेंद्र बांगर, महिला पो.कर्म,जयश्री नरवडे, वाहन चालक संजय जायभाये यांनी केलेली आहे.
Add new comment