Add new comment

पंकजाताई म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहून चिंता वाटली!

बीड दि.20 ( सिटीझन ) भाजप नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आपल्या ट्विटरवरून ट्विट करत बीड जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहून चिंता वाटली, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यासोबतच अधिक काळजी घ्यावी असे आवाहन देखील पंकजाताईंनी केले आहे.

माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहून चिंता वाटली! मी ही राज्यातील सर्वात गंभीर कोरोना hot spot मध्ये आहे. आजवर समाधान होतं जिल्ह्यातील परिस्थिती ठीक होती, आता मात्र अधिक काळजी घ्यावी. बीडचे कलेक्टर, सिव्हिल सर्जन, एस पी सर्वांशी बोलते आहे. असे पंकजाताईंनी म्हटले आहे. दरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून पंकजाताई मुंबईत आहेत.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.