बीड जिल्ह्यात आज पुन्हा तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह ; रुग्णसंख्या 33 झाली
बीड दि.23 ( सिटीझन ) बीड जिल्ह्यातून आज 43 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून 3 रिपोर्ट पॉझिटिव्ह तर 39 निगेटिव्ह आले असून 1 रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी.पवार यांनी दिली आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहिती नुसार दि. 23 रोजी पाठविलेले 43 स्वॅब नमुन्यांपैकी प्राप्त अहवाल पॉझिटिव्ह 3 असून निगेटिव्ह 39 आले आहेत तर 1व्यक्तींचा अहवाल (Inconclusive) आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी दिली आहे. दरम्यान आजच्या 3 रुग्णांमुळे जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 33 झाली आहे.
आजचे 3 रुग्ण कुठले आहेत
1 बीड
2 वडवणी
3 कुंडी ( ता. धारूर ) येथील असल्याचे समजते.
Add new comment