बीड शहरातील संभाजी नगर, बालेपीरच्या काही भागात कंटेंनमेंट झोन घोषित
बीड दि.24 ( सिटीझन ) शहरातील संभाजीनगर बालेपीर येथील चार व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्ती कोरोना, विषाणूचे लागण (COVID-१९ Positive) झालेला रुग्ण आढळून आला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रेखावार यांनी काही भागात कंटेनमेंट झोन घोषित केला आहे. आजपासून हा भाग पुढील अनिश्चित काळासाठी पूर्णवेळ बंद करण्यात आला आहे.
बीड जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, संभाजी नगर बालेपीर भागातील शेख खलीलोद्यीन शेख हफीजोद्यीन यांच्या घरापासून ते विजयकुमार किसनराव वीर यांच्या घरापर्यंतचा परिसर कन्टेनमेंट झोन (Containment zone) जाहिर करणे आवश्यक आहे, असा अहवाल जिल्हा आरोग्य
अधिकारी,बीड यांनी सादर केला आहे. त्या अनुषंगाने संभाजी नगर बालेपीर भागातील शेख खलीलोद्यीन शेख हफीजोद्यीन यांच्या घरापासून ते विजयकुमार किसनराव वीर यांच्या घरापर्यंतचा परिसर पुढील अनिश्चित काळासाठी पूर्णवेळ बंद करून संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.
Add new comment